STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

दिवा

दिवा

1 min
190

अभेदय सह्याद्री गातो

शूर शिवा तुझी गाथा ;

दान दिले स्वराज्याचे

आदरी झुकतो माथा.


सखे लाभले शिवास

बाजी-तानाजी-मुरार ;

गोरे-आदिल-निजाम

मोगल कापे थरार.


शिवा-मावळे वापरे

"गनिमी" काव्याचे तंत्र

"हर हर महादेव"

ओठी असे शिवमंत्र.


स्वराज्य झाले पोरके

जाता रयतेचा वाली ;

कानी पडता हुंदके

अश्रू पाषाणास आली.


असा लाखात आपला

"जाणता राजा" हा शिवा

लाख दिवे पेटवून

विझला तेजस्वी 'दिवा'


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational