ध्येयाची स्वप्न
ध्येयाची स्वप्न
सागरा एवढे अथांग
आकाशा परि विशाल...
वायु जसा अदृश्य
असंख्य चित्रांची जणू शाल...(१)
कधी न लागे याचा थांग
अनेक असती रुप...
मन असते कसे नकळे
क्षणात बदलते स्वरुप... (२)
किती गुजगोष्टी याच्या
चालती मनातल्या मनात...
सत्य पाहूनी नयनी
सजते आयुष्य स्वप्नात...(३)
जीवनी असावे ध्येय
ते पूर्ण करण्याचे मनी स्वप्न...
चालतांना ध्येयाची पाऊल
हाती मिळे अनुभवांचे रत्न...(४)
मनातल्या स्वप्नांची रांगोळी
त्यात भरावे यशाचे रंग...
सुरेख स्वप्नांची सुंदर दृष्य
कुणाचे कधी न व्हावे भंग...(५)
