अभंग विठ्ठलाचा
अभंग विठ्ठलाचा
1 min
152
माझा पांडुरंग | वसे पंढरित ||
जाऊ या वारीत | दर्शनाला ||१||
विठ्ठल रुक्मिणी | उभे विटेवरी ||
हात कटेवरी | ठेऊनिया ||२||
सावळे हे रूप | कानात मासोळी ||
बुक्का असे भाळी | विठ्ठलाच्या ||३||
टाळ वीणा हाती | पाण्याची कळशी ||
घेऊनी तुळशी | डोईवरी ||४||
तालात नाचती | गाऊन अभंग ||
माझा पांडुरंग | जगजेठी ||५||
