बाप्पा
बाप्पा
जय गणेशा गणराया
म्हणती तुला लाडाने बाप्पा
तु येतो भाद्रपदीच्या चतुर्थीला
प्रत्येक वर्षातून फक्त एकदा..
तुझ्या येण्याचा संचारतो उत्साह
दरवळते सर्वत्र नव चैतन्य
आनंदी-आनंदाचे वाहती झरे
प्रेम तुझ्यावर अपार माझे
जाती दिवस नकळे कुठे
जेव्हा येतो तु माझ्याकडे
सारे वाटती मला चांगले
मंगल ते सारे घरामध्ये
तुझ्या स्थापनेपासून असते घाई सारी
दोन वेळा पुजा नी आरती
तृप्त होती पंचइंद्रीये
पाहुन तुझे रुप भाबडे
मन होते तुझ्या नावाने दंग
मोदक खिरापतीचा गोड नैवेद्य
वाहतांना तुला दुर्वाची जुडी
वाटे या भुमीवर मिच आहे सुखी
तुझी वाट पाहतो तु येतोही
तु थांबतोस पण किती पटकन परत जातोस
प्रत्येक वर्षी तु असंच का रे करतोस
या वर्षी तरी माझं थोड ऐकशील का?
ऐ बाप्पा थोडं थांबशिल का?
