सखी
सखी
1 min
353
सखींचे असतात अनेक रुपे
मैत्रिण हेही नाव तिला साजे
सखी म्हणजे प्रेमळ सौख्य
ती असता बदलते भाग्य....
सखी सोबत रुसवे फुगवे
तिच्याच जवळ होते मन मोकळे
सखी देते उत्तर
असता प्रश्न मोठे...
सखी म्हणजे मार्गदर्शिका
दाखवते मार्गातला काटा
ती नाही देत अंतर
असता मतभेद अनेक विषयांवर..
चालता रस्ता गरज सोबतीची
नकळत होते भेट दोन मैत्रिणींची
सखी म्हणजे इंद्रधनुष्यातील सप्तरंग
बहरते मन जीवनी नव तरंग...
सखी म्हणजे जीवनी नव आशा
तिलाच कळते भावनांची शुद्ध भाषा...
