ये श्रीकृष्णा
ये श्रीकृष्णा
1 min
402
तू प्राणाहूनही प्रिय सर्वांना
ये श्रीकृष्णा नंदलाला कान्हा||धृ||
तन-मन माझे खुलले
मन वेडे तुझ्यावर भुलले
मोहक अश्या तुझ्या रुपांना
ये श्रीकृष्णा नंदलाला कान्हा||१||
पानं-फुलं ही हळुवार डोले
होई बावरी राधा वेलीवर झुले
घालुनी साद बासरिच्या सुरांना
ये श्रीकृष्णा नंदलाला कान्हा||२||
नटखट तू सारे खेळ खेळुनी
सुंदर मोरपिस केसांत माळुनी
सोबत घेऊनी गोप-गोपीकांना
ये श्रीकृष्णा नंदलाला कान्हा||३||
