दिवाळी सण दिव्यांचा
दिवाळी सण दिव्यांचा
1 min
478
लख्ख प्रकाश सर्वत्र
दिवाळी सण दिव्यांचा...
उत्साह नाचे मनी
वाहे झरा आनंदाचा... (१)
तिखट गोड अनेक पदार्थ
मिळूनी बने स्वादिष्ट फराळ...
घेऊन येतो नव चैतन्य धैर्य
अलौकिक हा दिपावलीचा काळ... (२)
दारात शोभतो आकाश कंदील
अंगणात सप्तरंगी रांगोळी...
फुलांपाणांचे सजते तोरण
नैवेद्याला पुरणाची पोळी... (३)
मंद ज्योती सोबत अंधारात
चमकणाऱ्या प्रत्येक दिव्यात...
अलगद येते सुख समृद्धी
पुन्हा नव्याने माझ्या घरात... (४)
