पणती
पणती
1 min
363
छोटीशी चिमुकली पणती
किती बरं छान दिसते...
तेल आणि वातीसोबत
मंद प्रकाशात हसते... (१)
वेगवेगळे देऊन आकार
नक्षी त्यावर काढलेली...
सुरेख रंगांणी रंगवून
अलगद कला कोरलेली...(२)
माती पासून बनते
निघते भट्टीत तापून...
प्रकाशाचा सण होई साजरा
पणतीच्या दिव्यातून... (३)
वाढवी शोभा दिवाळीची
घरोघरी लावून पणती...
जोडले नाते मनामनाचे
क्षण हे तेजात रंगती... (४)
