STORYMIRROR

Priyanka Amritkar

Others

3  

Priyanka Amritkar

Others

बदली ( transfer)

बदली ( transfer)

1 min
419

Transfer transfer म्हणजे नक्की काय असतं..... 


तीन चार वर्षांत एक बदललेलं गाव असतं.... 

गृहिणीसाठी ते नवीन भिंतीना घरपण देण्याचं आव्हान असतं... 

मुलांसाठी नवीन School, friends, teacher यांच्यात सहजतेने न डगमगता सामावून जाणं असतं... 

पुरुषांसाठी तर ते मोठंच धाडस असतं.... 

पहिली बायको नौकरी... 

दुसरी बायको पत्नी आणि परिवार या सर्वाना balance करत चालनं असतं..... 

Transfer transfer म्हणजे नक्की काय असतं.... 


आम्ही येत नाही म्हणून आप्तेष्टांच प्रेमळ रुसनं असतं.... 

त्याच्या त्या रुसण्यात लांब राहण्याचं आम्हाला मिळालेल बळ असतं.... 

छोटे मोठे event आंनद दु:ख मिस करन असतं... 

हे सर्व असूनही कुठेतरी स्वतः ला सिद्ध करत जगणं असतं.... 

 Transfer transfer म्हणजे नक्की काय असतं.... 


प्रत्येक ठिकाणी बदलणारा घर, office, school चा

पत्ता न अडखळता पाठ करुन पहिला सहजतेने विसरणं असतं.... 

Bank, किराणा, भाजी, गिरणी कुठे कंस आणि काय मिळतं हे सारं शोधणं असतं... 

Transfer transfer म्हणजे नक्की काय असतं... 


सारचं काही कसं वेगळ आणि नवीनच असतं... 

नवीन गोष्टी शिकणं वेगळेपण समजून घेणं असतं... 

त्या वेगळेपणात सामावून नंतर त्यातून अलिप्त होणंही असतं... 

यातही सुंदर असं काही दडलेलं शोधन असतं... 

Transfer transfer म्हणजे नक्की काय असतं..... 


सहज सोडवत नाही माणसाला जुन्या काही गोष्टी.... 

मग इथेच कामी येते माणसाची सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण दृष्टी.... 

यातूनच आर्थिक मानसिक आणि शारीरिक balance राखून निर्माण करावी लागते नवीन सृष्टी.... 

कसा होतो हा सुंदर असा प्रवास... 

3 - 4 वर्षांत नवीनच अभ्यास..... 

सर्व काही सेट करण्याचा मनी ध्यास.... 

अंगी धरावी लागते सातत्य मेहनत आणि चिकाटी ची कास.... 

सर्व काही पुन्हा नव्यानेच सुरूवात....             

खंरतर लिहिण्या बोलण्या इतक काही सोपं नसत..... 

पण जर सोडवायचंच ठरवलं तर अवघड गणितही सोप्पं होऊन सुटतं.....        


Rate this content
Log in