माहेरच्या त्या बागेत
माहेरच्या त्या बागेत
1 min
286
लागे ओढ बालपणाची
कितीही झालो मोठे जरी...
माझेच बालपण रम्य
असेच वाटे अंतरी...(१)
जावे मागे वाटते पुन्हा
एकदा लहान होऊनी...
चिंचा बोरे तोडावे
यावे शेतात त्या फिरूनी... (२)
रात्री झोपावे त्या अंगणात
आकाश चांदण्यांच्या कुशीत...
गप्पाचा मांडून तो डाव
आईला सांगावे दिवसाचे गुपीत... (३)
गावाच्या त्या जत्रेत
घेऊनी एक फुगा हातात...
वाटे न भीती कशाची
बाबा सोबत चालतात... (४)
सोबत सखी मैत्रिणींच्या
पुन्हा जावे शाळेत...
खुप खेळावे नी बागडावे
माहेरच्या त्या बागेत... (५)
