दिवाळी
दिवाळी
1 min
341
रात्री आकाशात दिसे
चांदण्यांची ही रांगोळी...
नव प्रकाशाचा सण
आली पहा ही दिवाळी... (१)
अंगणात काढूनीया
सप्त रंगाची ही नक्षी...
रम्य पहाटेच्या वेळी
गातो छान गाणे पक्षी... (२)
तेज सूर्याचे किरणे
सृष्टी ही प्रकाशमान...
लावू आकाश कंदील
वाढे घराची ही शान... (३)
जसा येतो रोपावर
मस्त बहर फुलांचा...
सारे घेती या आस्वाद
घरी केल्या फराळाचा... (४)
बघा शेतात काजवे
लख्ख असंख्य दिसती...
घरी अंगणी पणत्या
प्रकाशाने या सजती... (५)
