STORYMIRROR

Vineeta Deshpande

Inspirational

5.0  

Vineeta Deshpande

Inspirational

ध्यानस्थ

ध्यानस्थ

1 min
1.7K


युगानुयुगे हे अबोल योगपुरुष ध्यानस्थ

जणु इतिहासाचे काही पाने समाधिस्त


हे द्रष्टे, हे वक्ते यांनाच गवसला मार्ग मोक्षाचा

यांनाच झाला बोध अन शोध समस्त सृष्टीचा


बोध श्रुती अन स्मृतींचा।

शोध पुरुषार्थाचा अन ऋणत्रयींचा


बोध पुरुष अन प्रकृतीचा

शोध रज- तम-सत्व गुणांचा


बोध पंचमहाभूतातील तत्वांचा

शोध कर्तव्य अन कर्माचा

बोध इंद्रिये अन जाणीवांचा

शोध सृजनतेच्या सोहळ्याचा

आम्हा दिले आदर्श आयुष्याचे आंदण

जाणुन ही सारे आम्ही आजही का अजाण?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational