धून
धून


दुरच्या पैलतिरी ऐकली मी ओळखीची धून
विसरले क्षणात वास्तवात नांदते मनी ऊन..१..
देता-घेता संसाराच्या दुनियेत हरवली प्रीत धून
एक तुही झालास परका न ऐकताच मनाची खूण..२..
लेकरांच्या मागे धावता गवसली मायेची एक धून
रमले हौसेने पडली माझीच मला भुल..3..
निश्चय अढळ देई यशस्वी धून
ध्येय ओंजळीत झंकारे जीव विसावता थकून.४..