धर्माचे वादळ
धर्माचे वादळ
जिकडे तिकडे आज
धर्माचे वादळ पाहतो
सारे काही वेगळे
तरीही एकत्र राहतो
नाही आमची एक भाषा
पण शिकवण मात्र एक
काढून मनाचा वाकडेपणा
दूर तू प्रेमापासून फेक
कधीतरी प्रेमाने तू
जाणून घे सर्वांचे मन
सारे माणसे एकच
हे त्यातून तू जाण
प्रत्येकानी आज स्वतः
जबाबदारी घ्यावी
येत्या पिढीलाही एकात्मेची
शिकवण द्यावी
