STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

धम्मचक्र प्रवर्तन

धम्मचक्र प्रवर्तन

1 min
386

नागपूरच्या दीक्षाभूमी देऊनी दीक्षा

बहुजनांना मिळाली समतेची भिक्षा

जीवनाचे कल्याण तव जाहले

कोटी कोटी हृदयात बुद्ध कोरले


जगकल्याणाचा एकच मार्ग दिला

बुद्ध धम्माचा प्रसार केला

क्रांतीचा जय भीम नावाचा

साऱ्या जगात निनाद झाला


मनुस्मृती जाळून बाबाने केली

लढाई मानवतेच्या हक्कासाठी

बुद्ध, कबीर, फुलेंचा विचार

रुजविला जनमाणसांमधी


नव्हता प्रवेश कोणत्याच मंदिरी

शुद्रत्वाचा ठपका होता जीवनी

दिला सर्वांना समान अधिकार

उभारली नागपुरी आमुची पंढरी


 बुद्धाचा धम्म देऊन बाबाने

केले समस्त जीवनाचे सोने

कोटी कोटी या बहुजनांना 

मिळाले धम्मरूपी हे देणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational