धबधबा
धबधबा
.
धबधबा
डोंगरी मैना गाणे गाती
परि रंग तुझे का रे खुळे $$
मागं गुंफतो धागे सुंदर
दरीत धबधब दूधं झरे
रंग ऊनाचां भ्रमीत करतो
उडूनी पीतांबर खोल पडे...
भरभर वेगे रीळ सैलतो
सुगरण टाके नीटं भरे
आकाशाचे रंग रेखूनी
वाहतं जाई वस्त्र निळे...
तटातं रुतुनी हिरवी झाडे
जलातं दचकूनी फुलं पडे
पक्षी उडूनी सूरं मारिती
पंखावरुनी थेंब गळे...
तुषारं सानुले अधीर सर्वदां
हिरकणीचां रंग धरे
कणखर काळ्या पोलादाचां
क्षणाक्षणालां किसं झडे...
