STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

देव देतो दोन डोळे...!

देव देतो दोन डोळे...!

1 min
28.3K


आंधळा मागतो एक डोळा

देव देतो दोन डोळे.....!!!


आटपाट नगरात

गर्दी फार वाढळी जोरात

सारी चालली तोऱ्यात

रस्ता वाहे जोमात


ज्याला त्याला गडबड

वेळ नाही थांबण्यास

धडपड चालली सारी

टीचभर पोट भरण्यास


अंध रस्ता ओलांडू पाहे

त्याला अपघाताचे भय

कानोसा घेई काठी टेकून

सारे पळती त्याला पाहून


भला अपंग लुळा पांगळा

त्याने दिला खांद्याचा आधार

काठी खांद्यावरी टेकून

चाले आंधळा दोन डोळे घेऊन


पटले मला क्षणात

परमेश्वर आहे कणाकणात

नाही तो डोळस अंधळ्यात

जो जगतो डोळे असून अंधारात


शेवटी सत्य हेचि दिसले मला

आंधळा मागतो एक डोळा

देव देतो त्यास दोन डोळे

खरेच आपले देव सारे साधे भोळे...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational