डोळ्यातलं पाणी दे आता वाहू
डोळ्यातलं पाणी दे आता वाहू
ती- किती सतावशील रे सख्या...
किती वेळ फक्त तुला फोटोतच पाहू...
ये समोर अचानक कधीतरी
डोळ्यातलं पाणी दे आता वाहू...
तो- बघ सखे निरखून तू आरशास एकदा
डोळ्यातल्या डोहात तुझ्या किती लपून राहू...
भास होईल तुला माझाच सारखा
सांभाळ थोडं स्वतःला अशी नको हरवून जाऊ...
ती- नको ना रे कवितेचे हे बंध
तूच नको मला असं हरवून देऊ...
शोधण्याच्या बहाण्याने ये तरी आता
समोर उभा राहून मागे काहीच नको ठेऊ...
तो- मी कधीचाच तर उभा आहे वाटेवर त्या,
तुझं येणं बाकी असताना मी किती वाट पाहू...
हो मी ही तेच म्हणेल जे तू म्हणतेस
डोळ्यातलं पाणी दे आता वाहू....
