डोळ्यातल आभाळ
डोळ्यातल आभाळ
डोळ्यातल आभाळ आता झालय कोरडं भकास
दूरदूर वर नजर जाता होत आहेत अनामिक भास
कोरड्या जमिनीवर आता कसा पिकवायचा घास
गळ्याभोवती कर्जाचा डोंगर आवळतोय फास
खायला मिळना घरात मिठ अन् भाकर
कामाविना ठेविना कुनी शेतावर चाकर
हातावरल पोट त्याला खोलवर खड्डा पडलाय
पाणी पाजता लेकराला बा ढसाढसा रडलाय
अनवाणी फिरताना चटके बसत नाही उन्हाचे
उपाशी पोरांसाठी हात जोडावे कोणा कोणाचे
राबून दिसरात कसे फेडावे रिन लोकांचे
का कुढत जगावे ऐकत बोलणे टोकाचे
