STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

2  

Aarya S

Comedy Fantasy Children

ढुम ढुम ढुमाक

ढुम ढुम ढुमाक

1 min
109

लहान छोटा उंदीर, निघाला फिरायला,

फिरता फिरता त्याला, एक फडका मिळाला.


खुश झाला तो उंदीर, पाहून ते फडकं,

पण फडकं ते होत, थोडंस मळक.


बघताच ते फडकं, आला विचार हा मनी,

बघावी का याची एक, टोपी सुंदर शिवुनी.


धुण्यासाठी ते फडकं, गेला धोबी दादाकडे,

टोपी साठी हे पाहिजे, दादा धु ना हे फडके.


स्वच्छ धुवून धोब्याने, केले फडके परत,

टोपी शिवण्या उंदीर गेला, शिंप्याच्या घरात.


शिंपी दादाने शिवली, छान मजेदार टोपी,

गोंडे लावले टोपीला, टोपी शोभतच होती.


गळा घालुनी ढोलकी, टोपी घालून डोक्यात,

दरबारात तो निघाला, मोठ्या मोठ्यानेच गात.


राजाच्या टोपी पेक्षा, टोपी माझी किती छान,

ढुम ढुम ढुमाकं, ढुम ढुम ढुमाकं.


असे ऐकता राजाने,टोपी घेतली काढून,

गाऊ लागला उंदीर, वर आवाज करून.


"माझी टोपी घेतली, हा राजा आहेच भिकारी ,

ढुम ढुम ढुमाकं ढुम ढुम ढुमाकं".


रागावून त्या राजाने, टोपी परतच केली,

सेवकांना सांगुनिया, उंदराकडे ती फेकली.


टोपी मिळता उंदराने, गाण्या सुरवात केली,

मला घाबरला राजा, माझी टोपी मला दिली.


चिडवीत त्या राजाला, घालून ढोलक गळ्यात,

निघाली उंदराची स्वारी,


ढुम ढुमाक ढुमाक..

ढुम ढुमाक ढुमाक..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy