चंद्रमा धरेवरी
चंद्रमा धरेवरी
चंद्र भुईवर आला
प्रियकर घाबरला
प्रिया माझी बावरता
काय समजावू तिला?
कधी रुसे माझ्यावर
देई चंद्रमा उपमा
येता चंद्र भुईवरी
काय सांगू प्रियतमा?
रात्र उमले चांदणी
प्रीत फुले मनोमनी
साक्ष चंद्र नभांगणी
साक्षीदार नुरे कोणी
झाले कल्पनाविश्वाचे
वास्तवात रुपांतर
प्रेमिकांच्या दुनियेत
अवचित स्थित्यंतर
