चिऊताई
चिऊताई
चिवचिव
करत ही
लक्ष कसे
वेधू पाही
वावरे ती
खिडकीत
अंगणात
ओसरीत
दाणा पाणी
पोटभर
फिरते ती
घरभर
इवलीशी
किती छान
पाहताच
जाई ताण
देऊ तिला
कणभर
आनंदाने
क्षणभर
जागा थोडी
बगिच्यात
मनाच्या त्या
कोपऱ्यात
घरट्याला
सजवते
पिल्लांना ती
सांभाळते
पंखांना ती
बळ देते
उडायला
शिकवते
ओढ लागे
लेकरांची
घाई दाणे
टिपण्याची
उडे नभी
भूर्रकन
वाऱ्यासंगे
पटकन
करडासा
हिचा रंग
कावळ्याला
घेई संग
चिऊताई
घेई कष्ट
लहानगे
ऐकी गोष्ट
