चिमुटभर प्रेम
चिमुटभर प्रेम
आईला माझ्या मुळी नाही वेळ
झटपट झटपट करते जादूचे खेळ
गायब ती करी कणकेचा गोळा
ताटामध्ये पडतात खरपूस खरपूस पोळ्या
कचा कचा चिरते कोथिंबीर जुडी
हातावर ठेवते खमंग खमंग वडी
लाल लाल गाजर खसाखसा किसते
गोड गोड हलव्याची वाटी समोर येते
कडूकडू कारल्याची भाजी करते गोड
तिच्या हातच्या जादूला मुळी नाही तोड
कळत नाही माझी आई जादू कशी करते
विचारले तर म्हणते कशी -
चिमुटभर प्रेमाचा मसाला त्यात घालते
