छकुलीचा राग
छकुलीचा राग
खरा राग यायचा मला
छोटीशी असल्यापासून
गाल फुगवे गोबरे
रुसायची मनापासून
आई बाबा समजावत
काय झालं सांग सोनुले
मी तरीही गप्पगप्पच
मान वळे जमिनीकडे
नाकावरचा राग खूप
अवघडच निघायला
सुकामेवा नि जिलबीचा
खाऊ लागायचा बबीला
राग खुबीने काढायचे
बोलत हसतखेळत
गालात गोड हसताना
राग जायचा नकळत
आता रुसवा नि अबोला
सासरी कोण काढणार?
रुसवाही कळेना कोणा
रागही मीच सोडणार!
