चहा घेतांना
चहा घेतांना
एक तू...
एक चहा...
आणि एक रम्य संध्याकाळ...
या तिन्ही हव्याहव्याशा गोष्टी...
बाकी काहीच नको सोबतीला...
मग चौथी...
कविता...
ती आपोआप येते...
पाझरते खोल हृदयातून...
एकटीच...
तिच्या येण्याला काहीच निमित्त लागत नाही...
ना तिला अमंत्रणाचीही गरज असते...
पण ती जर कधी रुसली तर,
तिचा मागमूसही लागत नाही...
ती कुठं बसते माहीत नाही...
म्हणून मी तिचं कधीही मन मोडत नाही...
तिला रोज भेटतो...
तुझ्यासोबत रोज...
संध्याकाळी...
चहा घेतांना...

