चैतन्य
चैतन्य
पाडव्याला चैतन्याची गुडी उभारुनी
ह्रदयात मधुर गोडवा राखुनी,
चैत्र प्रारंभाला कार्य सारे शुभकरुनी
प्रार्थना मनोभावे करु मीपणा त्यागुनी....!!
प्रतिप्रदेला श्रीराम जानकी येता
अयोध्येत स्वागत करिती परोपरी,
विजयाचा जल्लोश नभी पताका
गुढ्या तोरणे जन उभारती घरोघरी.....!!
हिंदू परंपरेचा कलश द्योतक
काठी साडी श्रीफळ फुलवी वैभव,
मीरेजीरे,चींचगुळ,हिंग,सुुंठ,कुडुनिंब सैंधव,
सप्रमाण प्रसादे मिळे बलसौष्ठव.....!!
चैत्रात सप्तरंगाचा चैतन्य फुलोरा
फुटती मनी हे कुसु
माराधन मोहोर,
पंचम वेदातही हे संजीवन धन
अमृत सांडे दिव्यकाळी धरेवर .....!!
मराठी नववर्षाचे अती सुंदर नवरंग
जणू शिकवी एकतेचा महामंत्र,
कसा निसर्ग चैत्रात हा फुलला
जणू जाणतसे हा अभिजात विद्या तंत्र.....!!
सुर्याेदयाची लाली पसरे भूवरी
उलगडे नभात घंटारव चित्तरंजन,
मेघमनोहर नटती औदुंबरात
गुढ्या ऊभारू सारे मिळून मिसळून ......!!
लतावेली अन् पक्षी गाती मंगलगाण
भरती निसर्गात ही मस्त उन्माद,
कोकिळ कुंजन मंजूळ स्वर कानी
समृध्दी भरतो मनात आनंदनाद....!!