चाफा...!
चाफा...!
चाफा...!
चाफा बोलेना
चाफा चालेना
चाफा खंत करी
काही केल्या फुलेंना
बोलणार कसा...?
चालणार कसा....?
फुलणार कसा...?
खंत कसली त्यात..?
फुलायचंच नसेल तर..!
कौतुक कशाला करायचं
असल्या नकार घंटा घेऊन
जीवन जगणाऱ्या चाफ्याच
त्या पेक्षा
मर म्हणावं आणि नाद सोडावं
म्हणजे त्यालाही कळेल
आता झकमारत
जगावं लागेल आणि
मुकाट्यानं फुलाव लागेल
फुलाला की लेकाचा
इतकं सोपं जीणं
खावं प्यावं मजेत रहावं
हसत रहावं फुलत रहावं
आंनदाने आनंदात झुलत रहावं
समजलं त्याला
मला बर वाटलं....!
