बुधवार सुप्रभात...!
बुधवार सुप्रभात...!
याला पाहिलं आणि
सर्व गुण अवगुणांची
उजळणी झाली...
अवगुणांमुळे
गुणांना किंमत आहे
याची जाण झाली...
नाव ठेवतात
म्हणून आपलं नाव होतं
हे काही खोट नाही...
सकाळी सकाळी
वाकडी शेपूट
सरळ करणं काही बर नाही...
ब्रम्ह देवालाही
जे जमलं नाही
ते आपल्याला जमणं शक्य नाही...
तुझं बी राहू दे
माझं बी राहू दे
याला आता पर्याय नाही...
पाण्यात राहून
माश्याशी वैर
काही खरं नाही...
नाळ आपली
अशी सर्वांची
सर्व गुण सम्पन्न असते...
म्हणून
अवगुणांची खिल्ली
उडविणे काही बरं नाही...
दुसऱ्याच्या डोळ्यातलं
कुसळ पाहण्यापेक्षा
स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काढावं...
दुसऱ्याला सुधारण्या पेक्षा
आपल्यात सुधारणा करण्यासाठी
आता सदैव झटावं...
सौख्य समाधान शांतीच
आनंदाने खाऊन पिऊन
सुखी जीवन जगावे ...सुखी जीवन जगावं...!
