बकुळीचे फुले
बकुळीचे फुले
पहाट होताच चराचर
सृष्टी जागी झाली
अवतीभवती अवखळ वारा वाहात होता मंदधुंद
पाकळी पाकळी उमलली,
सर्वत्र दरवळला बकुळीच्या फुलांचा सुगंध
भ्रमरे ही भिरभिर करती चाखावयास मधुर मकरंद
बसुनी प्रत्येक फुलांवर पसरवती परागकणांचे गंध
रंग मार्दव पिवळसर सावळा
जरी न हिरमुसता गुणाच्या गंधाने जिंकायचं शब्द गंध होऊनी
करावे कधीतरी गुज,
सांगावी व्यथा मनीची
गंधित व्हावी दुःखे अवघी राहावीत सुखासवे आनंदी
भरगच्च असूनही अलगद
कसे रिते व्हावे
फांदीवरूनी ओघळतांना सुगंधापरी उरावे
जाते ही फुले आपल्याला शिकवूनी..... 🙏😊
