STORYMIRROR

Swapna Sadhankar

Tragedy

3  

Swapna Sadhankar

Tragedy

भयाण

भयाण

1 min
184

पांढऱ्या साडीत स्तब्ध उभं

घेऊनी अभागी बेरंगी कपाळ

कोरडा चेहरा, ओलाव्यासाठी आसवं

थकलेले पावलं, रिकामी ओंजळ

स्पंदनही ताल चुकलेले बेसूरे

भासतय का असं हे सत्य.......

हातात हात एकटेपणाचा

सोबतीला चालतेय निराशा

प्रवास काळोखातला लांबचा

न संपणारी वाट खडतळ

निस्तेज, निर्विकार, उदास, अपूरे

वाटतय का असं हे आयुष्य.......


तुझ्यासाठी झटणाऱ्याला

इथे मराणान्ति यातना

तुला खुंटीवर टांगणाऱ्याला

मात्र दूताच्या याचना

मांडलेला खेळ खेळायचा कसा

'जीवना' तुझा हा न्याय कळेना.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy