धास्ती
धास्ती
प्रेम करू नकोस इतकं
की तिरस्कारात बदलेल
मनाची जवळीक इतकी
अचानक दुराव्यात संपेल
विश्वास तर असतो आंधळा
म्हणून कधी कधी वाटते भीती
की वेड न लावून जावो
नकळत घेतलेल्या वळणांनी
करत असते प्रार्थना देवापाशी
लिहू नकोस निकाल नशिबी असा
की मैत्रीच लिहेल
एक धोक्याची कथा