रेशीम बंध
रेशीम बंध
1 min
132
तुझीच रे हसरी मूर्ती
जिथे पहावे तिथे दिसते
तुझ्या ओठांवरचे स्मित
आठवांना भुरळ घालते
तुझी ती मधाळ वाणी
पडसाद उमटवत घुमते
तुझ्या नजरेतील साद
सदा मोहवूनच सोडते
अन् राग अनुराग माझा
त्यातच विरघळतो सारा
सारे बंध सोडून हवाहवासा
तुझाच रे रेशीम बंध प्यारा