Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swapna Sadhankar

Others

3  

Swapna Sadhankar

Others

ते बेट

ते बेट

1 min
205


बेट म्हटलं की आठवतं मला

जगातील सर्वात मोठं ते बेट

पोहोचते मी माझ्या आवडत्या

आठवणींच्या गावात जाऊन थेट


विशाल पात्राच्या मधोमध बोट

बोटीच्या डेकवर झोंबणारा वारा

वाऱ्याने उडणारे केस सावरणारी ती

बोटीसवे हलकेच हेलकावे घेणारा मी


नजरेस दूरदूर पर्यंत पाणीच पाणी

खालून ऐकू येणारी अरिजीतची गाणी

अचानक दृष्टीस पडणारं हिरवंगार बेट

अन् सुस्वागतम करणारं रंगीबेरंगी गेट


उंच उंच झाडांच्या सावलीतून रस्ता

घरांच्या अंगणात तळ्याचा शिरस्ता

बांबूच्या मचाणावर बांबूची घरं

नी घरांच्या छतावर झावळे

भवती मोहरीची पिवळी शेतं

नी बहरलेले चहाचे मळेच मळे


ब्रह्मपुत्र नद ने वेढलेलं

दिवसागणिक छोटं होणारं

प्रवासी पक्षांचे आवडते स्थळ

पर्यटकांना घालते निसर्गाची गळ


महत् सत्र परंपरेने सजलेलं

नाट्य-नृत्य कलेने नटलेलं

सांस्कृतिक राजधानी आसामची

माजुली बेट आहे शान भारताची


🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿


Rate this content
Log in