Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swapna Sadhankar

Tragedy Classics

3  

Swapna Sadhankar

Tragedy Classics

तुझ्या सांडण्याला नको भेदभाव

तुझ्या सांडण्याला नको भेदभाव

1 min
148



तुझ्या सांडण्याला नको भेदभाव

न दुष्काळ न अतिवृष्टीचा घाव

कुठे पय थेंबाविन होतो मेळघाट

कुठे पुराला स्वाहा गावची गाव


तुझ्या सांडण्याला नको भेदभाव

न दीन-दुबळा न सामर्थ्याचा ताव

नाकर्ता सर्रास देतो बहाणे हजार

अन् विकलांग घेतो कर्तुत्वाचा ठाव


तुझ्या सांडण्याला नको भेदभाव

न काळ्यास हिनभाव न गोऱ्याची हाव

कुणा बुद्ध्यांक कुणा संवेज्ञता कुणा काय

शेवटी कुंपणापर्यंतच सरड्याची धाव


तुझ्या सांडण्याला नको भेदभाव

असे साऱ्यास सारखाच प्रेमभाव

सृष्टीचा निर्माता तू करता करविता

साधता समतोल निसर्गाचा खेळतो का हे डाव



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy