प्रेम-चित्र
प्रेम-चित्र
1 min
114
ते आकाशातले पाखरू
स्वच्छंदी उंच उडणारे
ते कुशीतले तान्हुले
लाडाने खळखळ हसणारे
ते पाण्यातील मत्स
लहरी सवे तरंगणारे
ते मातीतील सुमन
सुगंधी चहु दरवळणारे
ते मृदू मधुर गीत
सुरावटीत लहरणारे
ते काळजातले अंत-रंग
प्रेमासाठीच धडधडणारे
ते प्रियेचे प्रीत-वलय
प्रेम-चित्र न रेखाटणारे