भुंजगप्रयात
भुंजगप्रयात
मना सांग मी मोहरावे किती रे
जराश्या सुखाने फुलावे किती रे...!!
सजा ही कशाची जरा सांग ना तू
स्वतःच्या मनाला छळावे किती रे...!!
मला वाटते की मला टाळतो तू
तुझ्या टाळण्यावर रडावे किती रे...!!
तुझ्या आठवांनीच व्याकूळ झाली
सखीने हृदय गुंतवावे किती रे...!!
सुखाचाच व्यापार दुःखात केला
अता वेदनेवर भजावे किती रे...!!
