बहिणी...
बहिणी...
एक अनोखं नात आम्हा बहिणीचं
अनिवार ओढीच, मायेच,आपुलकीचं
म्हणतात ना आईच्या प्रेमाला कुणाचीही सर नाही
पण माझ्यासाठी माझ्या बहिणींचे प्रेम
त्या प्रेमातली उणीव भरून पाही
भाव मनीचे सांगतांना शब्द शब्द गुंफत जाई
होते मन मोकळे एवढे लहान-मोठ्याचा इथे भेद नाही
प्रत्येक सुख दुःख घेतलं जातं वाटून
त्यात नाही होत तुझं नि माझं असं काही
एकमेकांच्या आठवणी ही ठेवल्या जातात जपून
बंधन नसतं कुठलं असतो फक्त अतूट विश्वास
त्यामुळे निर्मळ हास्य नेहमी ओठावरती राही
कधी हक्काने रागवणारया कधी लाडाने जवळ घेणाऱ्या
सासरी जाताना डोळ्यात पाणी आणून
" आता तुला कोण ओरडणार" असं
रडता-रडता म्हणणाऱ्या
जीवापाड प्रेम करणाऱ्या
बहिणी बनून जातात आयुष्यात सर्व काही
कधी बनतात मायेची ऊबदार शाल
कधी बचावाची ढाल
कठीण समयी देतात साथ
सदैव असतो पाठीवरती मायेचा हात
कधी असतो काळजी रूपी धाक
तर कधी कौतुकाची थाप
असं वाटतंय कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ
बहिणीचं नात वाटतं मला चिरंतर गोड
नातं हे कसं दूध सायेचं
असंच राहो सदैव छत्र
माझ्यावर त्यांच्या मायेचं ...
