STORYMIRROR

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

भीमा तू शिल्पकार घटनेचा

भीमा तू शिल्पकार घटनेचा

1 min
1.8K


भीमा तू शिल्पकार घटनेचा

घटनेचा मसुदा तूच लिहिला

लिहिला हक्क आणि कर्तव्याचा

कर्तव्याचा विसर आम्हा का पडला ?


पडला होता समाज होवून मृत

मृत शरीरात प्राण तो फुंकला

फुंकला असा त्वेशाने की तो

तो समाज खडबडून जागा जाहला


जाहला जगी बोलबाला संविधानाचा

संविधानाचा मार्ग नवा दाविला

दाविला बुध्द धम्माचा तो मार्ग

मार्ग समतेचा प्रत्येक नागरिकाला


नागरिकाला व्यक्ती म्हणून मानले

मानले पात्र दिले मताधिकाराला

मताधिकाराला ज्याने जाणले

जाणले आता राजा मतदार झाला


झाला भीमा शिष्य महात्मा फुलेंचा

फुलेंचा वाडा होता ज्या क्रमांकाचा

क्रमांकाचा तो क्रम कायम लक्षात

लक्षात ठेवा पसारा तेवढाच घटनेचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational