भडाग्नी दयावा
भडाग्नी दयावा
उपेक्षीतांचे जीणे आजही उपेक्षीतच आहे,
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही संवेदना मरून गेल्या का आहेत?
मेलेल्या पत्निचे कलेवर नवऱ्याच्या खांदयावर न्यायची वेळ आज यावी
शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा फक्त शाळेतच रहावी....
भारत माझा देश असेल तर....
मेलघरागांव, कलाहांडी जिल्हा , ओडिशा राज्य माझ्याच देशाचे अंग
सर्व भारतीय माझे बांधव,
दानु मात्झी पत्नी त्याची अमंग अन् बारा बर्षाची मुलगी.....
त्यांची देशाशी अन् बांधवाशी यांचा संबंधच नाही का?
अमंगने संसाराचा गाडा चालवला
देह तो झिजवला , क्षयरोग मागे लागला...
साठ किमी अंतरावर जिल्हयाच्या ठिकाणी उपलब्ध होती त्यांना आरोग्य ती सेवा,
बाप लेकीनं मिळून , भरती केलं, आशेवर दिवस काढत मात्र अर्ध्यावर
संसार त्यांचा मोडला...
बाप लेक सैरभैर झाले
मृतदेह नेण्यासाठी, अधिकाऱ्यांच्या पायाही पडले...
पैसा नाही खिशात, सरकारी बाबू दूर लोटती,
होती हरिश्चंद्र योजना टाळू वरील लोणी खाती....
आटला माणूसकीचा पाझर ....
बाप लेकीच्या डोळ्यातील अश्रु अखेरचा टीपला.....
शव गुंडाळून घेवून चादरीत जुन्या
आज पत्निचा भार त्याने खांदयावर घेतला....
काय हे मरण स्वतंत्र भारतातले....
उपेक्षितांना वाली नाही,स्वप्न प्रगतीचे....
मिडीया , पत्रकार पाहुन नजारा तो,
फोन मग खणानले...
दहा किमी कलेवर घेवून चालल्यावर
मदतीचे वाहन आले....
माझ्या देशात अशी दशा...
मेल्यावरही ही अवहेलना...
माणुसकी मेलेली पाहुन वाटते...
मरणाआधी, सरण रचून स्वतःचे....
विधिवत भडाग्नी दयावा....
समाज व्यवस्थेला या, स्वहस्ते...
