भावना
भावना
माझ्याच बाबतीत नेहमी,
का हो असं घडतं?....
घरातलं सर्वच काम,
नेहमी माझ्याच अंगावर पडतं.,..
सकाळचा अलार्म सात ही दिवस ,
हा माझ्यासाठीच असतो...
घरकामात हात लावायला,
वेळ ही कोणाकडे नसतो....
सर्वांचं करता करता,
मिळत नाही वेळ स्वतः साठी....
अपमान सहन करावा लागतो,
माझ्या हक्काच्या मतासाठी....
इच्छा माझ्या नेहमीच,
अश्याच जातात जळल्या .....
मी पण एक घरातील व्यक्ती आहे,
या भावना अजून त्यांना का नाही ओ कळल्या???...
