भाव..!
भाव..!
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला
तुझ्या प्रीतीची देवा
जाण आज मज झाली
म्हणुनी तुझ्या दर्शनाची
वारी अशी घडली
प्रश्न मनात माझ्या
अनेक येत होते
निराकरण कधी
त्याचे झालेच नव्हते
आज मात्र देवा
जाणलेस सर्व काही
उत्तरास आता
प्रश्न मनी उरलाच नाही
कधी कधी ची
आस माझी आज तृप्त झाली
कृपा पाऊनी देवा
सेवा फलद्रुप झाली
अशीच कृपा दृष्टी
सदैव मजवरी राहू दे
आशीर्वादाचा हात तुझा
अखंड शिरावरी असू दे....!
