बाप
बाप
बाप माझा साधा भोळा
कपाळी गंध बुक्का टिळा
कठीण काळी शिकला शाळा
लागला अभ्यासाचा लळा
शिकवलं साऱ्या मुलांना
केलं पायावरी उभे
कधी ना कुणाकडे
व्यक्त केले मनसुभे
ज्ञान दानच कार्य बाप
करी मनापासून,उभी केली
पिढी सारी,शिक्षणाची केली वारी
प्रेरणा साऱ्यांना दिली
जीवनाचे शिक्षण देऊनी
करी तो परोपकार
घरादाराचा कधीही न
केला त्यांनी विचार
बाप माझा वारकरी
विठ्ठलाची वारी करी
प्रवचन,भजनातूनी
जनप्रबोधन हो करी
गळा माळ तुळशीची
सोन मृतिके समान
नसे हाव कशाचीही
राही सदा आनंदानं
