बाप
बाप
माझ्या जन्माआधीची रे
माय सांगते कहाणी
मुल नव्हत नशीबी
वांझ पणाची कहाणी
आठ वर्षे मुल नाही
जणू सुकली रे कुस
वांझोटीचा दोष मला
म्हणे वांझुटा तयास
नसे घाबरत कधी
दोष स्वतःवर घेई
नव चेतना देउणी
म्हणे होईल तु आई
भाग्य माझ तोच खर
दुर ठेवी दुःख सारी
माझ्यासाठी परिस तो
जीवनाच सोन भारी
तसा समजुतदार
कष्ट त्याच रे अफाट
नाही थकवा थांबन
माझ सौभाग्य भन्नाट
धंदा त्याचा मासेमारी
जाळ पागतो नदित
मासुळीच्या कमाईचे
पैसे द्यायचा हातात
लेकराची होती आस
झुरायचा तो मानात
मुल कुणाच पहाता
फुलायचा आनंदात
पती निर्मळ मनाचा
नाही कसलं कपट
गडी चांगुलपनाचा
मानपान त्याचा वट
झालो दोघे दोष मुक्त
मला मातृत्व लाभल
भाग्य त्याच चमकलं
त्याला पितृत्व लाभल
झाला सुखद संसार
बाळा तुझ्या येण्याने रे
पिता करी संगोपन
धुंद झाल जीवन रे
कसा वाढला प्रेमात
आई बापाच्या छायेत
पुत्र तु प्रिय आमचा
सुखावलो रे तुझ्यात
एक आस मनी त्याच्या
अनपड न राहो तु
त्यान जे केले जीवनी
तसे नाही करावे तू
तुला देऊनी शिक्षण
मात रे अडाण्यावर
घडवला तुला बा न
दिले जीवनी संस्कर
तुझा अभिमान त्याला
म्हणे पुत्र गर्व माझा
आज साहेब तू उभा
बाप तो विधाता तुझा
आई देतो ग वचन
सेवा दोघांची सदैव
माझा आदर्श वडिल
रुप त्याचे जणू देव..
