बाप तेंव्हाच कळतो...
बाप तेंव्हाच कळतो...
आई ची माया तर वेडीच असते
म्हणून ती सदैव पाठीशी उभी राहते
बाप मात्र तेंव्हाच सावरतो
जेंव्हा आपला खरोखरंच तोल जातो...
आईचे गोडवे गाणं सार्थ असलं तरी
बापही समजून घ्यावं कधी- मधी...
आईच्या भावना सह्ज कळ्तात
बापाच्या वेद्ना अव्यक्त, अबोल असतात...
आई रड्ते हसते प्रसंगी मनसोक्त
बापाला मात्र त्याचीही मुभा नसते
कधी कधी आई मायेपोटी वाईटाचंही समर्थन करते
बाप मात्र सागरासारखा धिरगंभीर, संस्कारच पेरतो...
आईचे गोडवे खुशाल गा पण...
बापाचं -ह्दयही समजून घ्या
बाप तेव्हाच कळतो मित्रहो
जेंव्हा आपण स्वतःच बाप होतो ....
