STORYMIRROR

Mina Shelke

Inspirational

3  

Mina Shelke

Inspirational

बाप माझा

बाप माझा

1 min
29.2K


बाप माझा कष्टकरी...

हाडाचा पक्का शेतकरी

कष्टाची घालण्या भाकरी

काळ्याआईची करी चाकरी..


उन्हातान्हात प्रपंचासाठी, राबताना

घामाच्या धारात भिजायचा

सुखासाठी आमुच्या, अहोरात्र

चंदणापरी देह झिजवायचा


थकला भागलेला बाप, जेव्हा

भजनात तल्लीन व्हायचा ...

तेव्हा, साक्षात पंढरीचा 

सावळा विठूराया भासायचा...


जिवाशिवाची बैलजोडी

लेकरावाणी जीव लावायचा

मुक्या प्राण्याशी ,जोडलेली नाती

प्राणपणानं ,जीवापाड जपायचा 


दिनदुबळ्यांची होती कदर

देई ताटातली अर्धी भाकर

उंब-यातून कधी न,गेला

कुणी उपाशी साधूफकीर...


वेड्याबागड्यांची करी सेवा

सेवाव्रती हा वात्सल्यमूर्ती

स्वःहस्ते न्हाऊमाखू घाली,

भासे तेव्हा, कनवाळू ईश्वरमूर्ती


होता स्वाभिमानी , करारी

कुणापुढे न पत्करली लाचारी

कितीही येवो अस्मानी संकटं

हरला नाही ,नैराश्येच्या बाजारी


अपार कष्टाचा हा देह

त्यालाही असतं एक मन

विसरू नये ,आपण मोल !

बापाचं जीवन असे,अनमोल...


बाप गेला देवाघरी ,

भक्कम वटवृक्ष आधार

असून सुख सारे...

भासतो जीव निराधार ...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Mina Shelke

अभंग

अभंग

1 min വായിക്കുക

अभंग

अभंग

1 min വായിക്കുക

लॉकडाऊन

लॉकडाऊन

1 min വായിക്കുക

सावधान !

सावधान !

1 min വായിക്കുക

अभंग ..

अभंग ..

1 min വായിക്കുക

अभंग ..🌺

अभंग ..🌺

1 min വായിക്കുക

अभंग

अभंग

1 min വായിക്കുക

Similar marathi poem from Inspirational