बाप माझा शेतकरी
बाप माझा शेतकरी
जात आमची कसणा-याची
ऊन पावसात राबणा-याची
असं म्हणणार बाप आमचा
डौलदार पीकं याव म्हणून
जीव ओवाळून टाकणारा
बाप माझा
काडी काडी गोळा करून
आपला संसार सांभाळतो
बाप माझा
वाळलेल्या दोरीचा देह त्याचा
उंबरातल्या किड्यासारखा सतत
दुःखातच अडकून राहणारा
बाप माझा
चिल्या पिल्यांसाठी दिव्यासारखा जळणारा
वा-याशी,ढगाशी सतत सतत भांडणारा
बाप माझा
कधी हरणारा कधीतरी जिंगणारा
दुःखाला सुख मानून स्वतःवरच हसणारा
बाप माझा
अन्न दाता बाप माझा
कष्टाची भाकर बाप माझा
पोशिंदा जगाचा बाप माझा
वांझोट्या धरणीला माय म्हणणारा बाप माझा
