बालपणीची मैत्री
बालपणीची मैत्री
बालपणीची मैैत्री
जिव्हाळ्याची खात्री
प्रेम निरपेेक्ष निखळ
आनंददायी आगळ
जातपात ना भेदभाव
मनी वसे भोळा भाव
एकमेकांसाठी जीव
खरच तुुटतो राव
भांडता होते कट्टी
क्षणात पुन्हा बट्टी
नाही राग ना कुुणी हट्टी
नाही आकस क्षणीच गट्टी
चिंच बोर आवळे
वाटून खातात सगळे
नातेच हेे जगावेगळे
जपावे तेे मनातले
बालपणीचा सुवर्ण काळ
मैैत्रीची गुंफावी मोतीमाळ
विणावी नात्याची घट्ट वीण
आधारस्तंभ हा मनात होता शिण
