बालपणीची मैत्री
बालपणीची मैत्री
बालपणीची अवखळ मैत्री
माझ्या शाळेचा पत्ता होती
मागच्या बाकावर आम्हा
मैत्रीणीची सत्ता होती
चित्रविचित्र स्वभावाचे
एकेक जण नमुने होते
त्यांच्याविना शाळेचे
बाक सुने होते
गैरहजर मैत्रीणीची
उणीव नेहमी जाणवायची
बाकावरची मोकळी
जागा सतावत राहायची
मैत्रीणीबरोबर आनंदाने
सजा आम्ही भोगायचो
खेळाच्या तासाला
खेळाचा आनंद लुटायचो
