STORYMIRROR

Deore Vaishali

Children

3  

Deore Vaishali

Children

बालपण

बालपण

1 min
190

जबाबदारी पडल्यावर लहान होता येत नाही 

एकदा आली अंगावर कि सोडताही येत नाही,

तेव्हा बालमन मनात पिंगा घालू लागत,

आपल्याला पुन्हा छोटं व्हावंसं वाटत...

लहान असतांना वाटत पटकन व्हावं मोठं,

खेळावेत चार पैसे हातात,आपलीच असावी आपल्यावर वचक,

तेव्हा सोनेरी ते पर्व बालपणाच आपल्यावर रुसतं,

बालपण मग मोठं होण्यात गुंतत...

पण ह्यातही असतो एक मोरपंखी दूवा,

मैञीचा तो अनोखा मिञमैञिणींचा थवा,

संकट असो कि दु:ख आधार भक्कम असतो,

वणव्यात ही गारव्याचा आभास मनी भासतो...

मैञीचे रोपटे कधी कोमजत नाही,

बालमित्र-मैञिणी कोणी पटकन विसरत नाही,

जीवन सुंदर आहे .. हसून खेळून पटकन कटत,

येथे दु:ख तरी कधी कुणाला चुकत...

संकटे अनेक त्यामुळे खचलीत मने

बनू आधार, देऊ एकमेकांना साथ,

एकटे कोणीच नाही हो.

धिराने करु ह्या सार्यां संकटांवर मात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children