बालपण सरले
बालपण सरले
बालपण सरले कुठे
कळलेच नाही कधी
मैत्रीची ताटातूट झाली
कळलेच नाही कधी
पहिला दिवस शाळेचा
आठवतो आजही मला
तुच भरवला होतास
डब्यातील घास मला
हातात हात घालून
दोघेही डुुुलत जायचो
शाळेबाहेर कैरी चिंचा
मिठ लावून खायचो
झाडाखाली बसुुन अभ्यास
दोघांनाही आवडायचा
उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र
नुसता धुडगूस घालायचा
वाटा बदलत गेेेेल्या
तरिही मैत्री सरली नाही
आयुष्यात पुढे जाताना
बालपण उरले नाही
मागे वळून पाहताना
काळ परत डोकावतो
आठवणीच्या झोक्यावर
अलवार झोके घेतो
